संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

प्रसिद्ध ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबईत – प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. भार्गवी नारायण या दीर्घकाळ आजारी होत्या.

भार्गवी यांच्या नातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांचा मुलगा प्रकाश यांनी सांगितले की, त्यांच्‍या इच्‍छेनुसार पार्थिव सेंट जॉन्स रुग्णालयाला दान करण्यात येईल. त्यांचे डोळे नेत्रधाम संस्थानला दान केले जातील. भार्गवी यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. यामध्ये एराडु कानासु, हंथकाना सांचू, पल्लवी अनुपल्लवी, वंशवृक्ष यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. टीव्हीची लोकप्रिय मालिका मुक्तामध्ये त्यांनी काम केलं आहे. यातील त्यांचा अभिनय दमदार होता. या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भार्गवी यांनी ६०० हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami