न्यूयॉर्क – प्रसिद्ध ‘झूम` व्हिडिओ कम्युनिकेशन्स कंपनीला देखील मंदीचा झटका बसला आहे. झूम कंपनीने 1300 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्माण घेतला आहे. याबाबतची माहिती सीईओ युआन यांनी एक ब्लॉग पोस्ट करून माहिती दिली.
युआन यांनी आपल्या ब्लॉगमधून सांगितले की, ‘कंपनीच्या अवस्थेवर मी स्वतःला जबाबदार धरत आहे. मी स्वतःचा पगार कमी करत आहे. बोनस देखील सोडणार आहे. मागील वर्षी माझा मूळ पगार 301,731 होता, त्यात 98 टक्के कपात केली जाईल आणि 2023 आर्थिक वर्षासाठी मी कॉर्पोरेट बोनस सोडेल. मे 2022 च्या फाइलिंगनुसार आर्थिक वर्ष 2022 साठी एकूण भरपाई 1.1 दशलक्ष होती. कार्यकारी नेतृत्वावरील इतर 20 टक्के मूळ वेतन कपात घेतील. कंपनीत 15 टक्के नोकर कपात करण्यात येणार आहे.