संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनोरंजन सृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील जुहूस्थित राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत रवी टंडन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रवीना टंडनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वडीलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.यामध्ये तिच्या बालपणीचा फोटोसुद्धा आहे. तसेच विविध पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटोसुद्धा आहेत. अभिनेत्रीने फोटो शेअर करत एक भावुक पोस्टसुद्धा लिहिली आहे.’तू नेहमी माझ्याबरोबर राहशील, लव्ह यू बाबा’.

आग्रामध्ये जन्माला आलेले रवी टंडन यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. १९६० मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते. रवी टंडन यांनी अमिताभ बच्चन यांना ‘मजबूर’ आणि ‘खुद्दार’ सारखे हिट सिनेमे दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami