संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

प्रसुती वेदना आल्याचे नाटक
विमानाला आपत्कालीन लॉंडिग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बार्सिलोना – मोराक्कोहून तुर्कीला जाणाऱ्या प्रवासी विमानातून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला विमान हवेत असताना प्र GVसुती वेदना सुरू झाल्याचे सूचना दिली. त्यानंतर विमान स्पेनच्या बार्सिलोना विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. विमान खाली उतरल्यानंतर निष्पन्न झाले की महिलेला प्रसुती वेदना झाल्याच नव्हत्या.
मोराक्को आणि स्पेन यांच्यातील प्रवासी संकट काही केल्या थांबताना दिसत नाहीय. बुधवारी आफ्रिकी देश मोराक्कोच्या प्रवाशांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्यासाठी अजब शक्कल लढवली. प्रसुती वेदना झाल्याचे सांगितल्यामुळे बार्सिलोना विमानतळावर विमानाचे आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. त्यानंतर ॲम्ब्युलन्स आणि पोलीस गस्ती पथक पोहोचले. महिलेला विमानातून उतरवले जात असताना त्याचवेळी 28 प्रवाशांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यातील 14 प्रवासी पळून जाण्यात यशस्वी झाले.
महिलेची रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता तिला प्रसुती वेदना होतच नव्हत्या तिनं नाटक केल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती स्पेन सरकारनं दिली. यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami