संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना ३ महिने पगारच दिलेला नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- जनतेच्या आरोग्याची जबाबदारी पेलणाऱ्या राज्यातील सुमारे २५०० प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल तीन महिने पगारच मिळालेला नाही.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य पथकातील या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी दिवाळीपूर्वी हा थकीत पगार दिला जावा अशी मागणी औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी केली आहे.
राज्यभरातील या प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना जुलै,ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्याचा पगार दिला गेलेला नाही.या कर्मचाऱ्यांनी आज ना उद्या पगार मिळेल या आशेवर गणपती सण कसाबसा उसनवारी करून साजरा केला.पण आता दिवाळी तोंडावर आली तरी शासनाचा आरोग्य विभाग या कर्मचाऱ्यांचे कामाचे वेतन देण्याचे सौजन्य दाखवू शकलेले नाही.राज्यातील प्राथमिक आरोग्य पथकामध्ये आरोग्य सहाय्यिका,आरोग्य सहाय्यक,औषधनिर्माण अधिकारी,आरोग्य सेवक आणि शिपाई यांचा समावेश असतो.या सर्वच कर्मचाऱ्यांना तीन महिने झाले पगारच मिळालेला अनही.त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे.हे कर्मचारी कर्जबाजारी बनत चालले आहेत.त्यांच्या कर्जाचे हप्तेही वेळेवर जात नसल्याने वसुलीचा तगादा वाढत चालला आहे.तरी दिवाळीपूर्वी तरी हे थकीत वेतन या कर्मचाऱ्यांना दिले जावे अशी अपेक्षा औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami