संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

प्रिंटींग मिस्टेक; पश्चिम बंगालचे विधानसभा अधिवेशन रात्री २ वाजता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यपाल आणि सरकार यांच्यात समन्वय नसल्यास काय घडू शकते हे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र अनुभवतोय. मात्र पश्चिम बंगालमध्येही तसाच प्रकार सुरु असून प्रशासनाच्या एका प्रिंटींग मिस्टेकमुळे राज्यपालांनी चक्क रात्री दोन वाजता विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड आणि मुख्यमंत्री ममता बेनर्जी यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे राज्यपाल धनकड हे सरकार किंवा प्रशासन यांच्याकडून चुका झाल्यास त्याबाबत कडक भूमिका घेतात. पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चपासून सुरु होणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. त्यात चुकून २ पीएम ऐवजी २ एएम अशी प्रिंटींग मिस्टेक झाली. त्यामुळे राज्यपालांनी मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते. पण ते भेटीसाठी गेलेच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी रात्री २ वाजल्यापासून अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली आणि ट्विटरद्वारे याची माहितीही देऊन टाकली. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे, कारण स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता. मात्र त्यावरून आता पश्चिम बंगालमध्ये राजकारण सुरु झाले आहे. विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, राज्यपाल ती चूक दुरुस्त करू शकले असते मात्र त्यांनी मुद्दाम ती चूक तशीच ठेवली. राज्यपालांना या आधी दोन वेळा प्रस्ताव पाठवले होते त्यात २ पीएम असा उल्लेख होता तिसर्या प्रस्तावात चुकून मिस्टेक झाली त्याचे एवढे भांडवल करायची गरज नव्हती असेही ते म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami