संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

फटाक्यावरील बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली – दिल्लीत फटाक्यांवर घालण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी करणारी भाजप नेत्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . लोकांना किमान शुद्ध हवेत श्वास घ्यायला तरी द्या. तसेच फटाक्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मिठाईवर खर्च करा असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. त्यात आणखी फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडू नये म्हणून दिल्लीत फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे .

या बंदीच्या विरोधात भाजप नेते मनोज तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यात त्यांनी म्हटले होते कि जीवनातील अधिकारांच्या बहाण्याने धर्म स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही. आणि म्हणूनच दिल्ली सरकारने फटाक्यांवर जी बंदी घातली आहे, ती मागे घेण्याचे आदेश सरकारला द्यावेत. अशी याचिकेत मागणी केली होती . त्यावर आज सुनावणी झाली . मनोज तिवारी यांचे वकील शशांक झा यांनी या प्रकरणी युक्तिवाद करताना . सर्वोच्च न्यायालयानेच ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी दिलेली आहे याची आठवणही न्यायालयाला करून दिली . मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली . दिल्लीत प्रदूषण असताना फटाक्यांवर घातलेली बंदी उठवता येणार नाही. लोकांना आज शुद्ध आणि मोकळ्या हवेची गरज आहे. फटाक्यांमुळे दिल्लीतील हवा आणखी प्रदूषित होईल . त्यामुळे जे पैसे फटाक्यांवर खर्च करणार आहेत तेच मिठाईवर खर्च करा असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. दिल्ली सरकारने दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी घातली आहे . तसेच बंदीचे उल्लंघन करणाऱ्यास स्फोटक अधिनियम कायद्याच्या कलाम ९ बी अन्वये २ हजार रुपये रुपये दंड आणि ६ महिन्याचा तुरुंगवास अशा शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली होती .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami