फरार घोषित केल्यानंतर परमबीर सिंग चौकशीसाठी हजर, म्हणाले…

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार झाले होते. मुंबईच्या कीला कोर्टानेही त्यांना फरार घोषित केलं होत. त्यानंतर आज त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर परमबीर सिंह यांना सोडण्यात आलं आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात करोडोंची वसुली केल्याची तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर सिंग यांच्यामागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आज तब्बल सात तास चौकशी झाल्यानंतर तपासात जे सहकार्य करायचे होते ते आम्ही केले आहे आणि करत राहू, अशी प्रतिक्रिया सिंह यांच्या वकिलांनी दिली.

परमबीर सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी आज तपासासाठी हजर झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मला आदर आहे. जसा कोर्टाचा आदेश आहे त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे. याशिवाय आपल्याला काही बोलायचं नसल्याचं सिंह म्हणाले.

सिंहांनी सर्व आरोप फेटाळले

गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे आणि विमल अग्रवाल यांच्यात काय झाले, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. सचिन वाझे यांनी आजवर आमच्या नावावर जे काही जमा केले आहे, त्याची आम्हाला अजिबात माहिती नव्हती. आमच्यावर जे काही आरोप झाले त्यात तथ्य नाही, आम्ही कोणाकडे पैसे मागितले नाहीत,” असे सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले आहे.

फरार घोषित केल्यानंतर चौकशीसाठी हजर

दरम्यान, अनेक वेळा चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केलं होतं. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.

Close Bitnami banner
Bitnami