संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

फरार हिरे व्यापारी निरव मोदीच्या मालमत्ता जप्तीची ईडीला परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याकरता मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला परवानगी दिली आहे. ईडीकडून काही दिवसांपूर्वी ही मालमत्ता जप्त करण्यासाठीची मुंबई सत्र न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश कर्जवसुली लवादाने यापुर्वीच दिले होते.तर मोदीकडून पैसे वसूल करण्यासाठी एचसीएल हाऊसचा लिलाव करण्याचे आदेश देखील यापुर्वीच दिले होते.दरम्यान,आता ईडीला देखील नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयाने दिली आहे. मोदीची जवळपास ५०० कोटींची ही मालमत्ता असून यात रिदम हाऊस,अलिबाग बंगल्यातून जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि २२ महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami