संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

फाल्गुनी पाठकच्या नवरात्री गरबा महोत्सवाविरोधात याचिका दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : गायिका फाल्गुनी पाठकच्या नवरात्रीमधील कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोजकांकडून महोत्सवासाठी कमी शुल्कात मैदान बुक केले जाते मात्र महोत्सवादरम्यान खादयपदार्थांचे स्टॉल,पार्किंग आणि तिकिटे विकून आयोजक करोडो पैसे कमावतात.त्यामुळे कांदिवलीतील दिवंगत प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे होणारे व्यावसायिक वापर रोखण्यासाठी वकील मयुर फरिया आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या आयोजकांनी फाल्गुनी पाठकसोबत 10 दिवस नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यासाठी अर्ज दाखल केले. त्यानंतर गायिका फाल्गुनी पाठक या या क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर करत असल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप आणि वकील मयुर फरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याचिकेत तिकीट शुल्काचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.कार्यक्रम हे विनामुल्य केले पाहिजे. पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल या मार्गातून पैसे कमावू नये, अशी मागणी फरिया यांनी केली आहे.त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात हे मैदान क्रीडांगण म्हणून निश्‍चित करण्यात आले होते. त्यामुळे क्रीडा संकुलाची मैदाने जनतेसाठी नेहमीच खुली असली पाहिजे आणि कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी मैदानाचा वापर होता कामा नये. खेळाच्या मैदानाचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जात असेल तर ते सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात यावे. मुंबईत खूप कमी खुली मैदाने आहेत की जिथे नागरिक ताजी हवा घेऊ शकतात. मैदान असे बंदिस्त केले जाऊ शकत नाही आणि लोकांना तिथे जाण्यापासून अडवले जाऊ शकत नाही असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या फाल्गुनी पाठक यांच्या नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत 800 ते 4200 पर्यंत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami