संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

फिनटेक क्षेत्राचे गुंतवणूक बँकिंग क्षेत्रातील परिवर्तन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

फायनान्शिअल टेक्नोलॉजी किंवा फिनटेकमुळे वित्तीय क्षेत्रात अनेक प्रकारे परिवर्तन घडले. तरीही फिनटेकचा पूर्ण लाभ अद्याप काही क्षेत्रांना मिळालेला नाही. सुरुवातीला, फिनटेक हे अभिनव स्टार्ट-अप्स किंवा लघु, मध्यम व्यवसायांसाठी राखीव होते. मात्र सध्याच्या काळात, मोठ्या कंपन्यांनाही त्यांच्या प्रक्रिया अधिक सोप्या आणि वेगवान करण्यासाठी फिनटेकची गरज भासत आहे. फिनटेक क्षेत्राने गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडवले आहे.

गुंतवणूक बँकिंग : भांडवलासह अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी या क्षेत्राला नव्या भागीदारी व बिझनेस मॉडेलची गरज आहे. भविष्यातील डिजिटल इनोव्हेशनची याला आवश्‍यकता आहे. प्रगत ॲनलेटिक्ससारखे सोल्युशन्स ट्रेडिंग पॅटर्नचा अंदाज वर्तवणे, गुंतवणूकदारांचा स्वभाव व भावना समजून घेणे आणि अचूक डेटा दृष्टीकोन प्रदान करू शकतात. यासोबतच, फिनटेकने ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेसारखी गेम-चेंजिंग टेक्नोलॉजी सहज उपलब्ध करून दिली. गुंतवणूक बँकांसाठी, दीर्घकालीन शक्यतांचे विश्लेषण करण्याकरिता, तसेच अल्प मुदतीच्या नफ्याला प्राधान्य देताना, फिनटेक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच गुंतवणूक बँकांनी क्लाउड कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानाकडील कल आता कमी केला पाहिजे.

फिनटेक इनकॉर्पोरेटिंग कसे सुरू करावे? : नव्या तंत्रज्ञानाची कुठे गरज आहे, हे सर्वप्रथम ओळखले पाहिजे. दुसरे म्हणजे, गुंतवणूक बँकांनी योग्य तंत्रज्ञान पॅटर्न निवडले पाहिजेत. अखेरीस, प्रभावी नूतनाविष्काराला प्रोत्साहन देणारी देखभाल यंत्रणा संस्थेअंतर्गतच स्टेकहोल्डर्सनी तयार केली पाहिजे. कंपन्या फिनटेक स्वीकारण्यासाठी पुढे जाताना, एक लक्षात ठेवले पाहिजे की, फिनटेक कंपन्यांना भांडवली बाजाराच्या गुंतागुंतीपेक्षा तंत्रज्ञानाची जास्त चांगली कल्पना असते. तसेच तंत्रज्ञान आधारीत इनोव्हेशनचे फायदे दीर्घ मुदतीत लक्षात आल्याने गुंतवणूक बँकांकडून अल्प मुदतीत परतावा मिळण्याची अपेक्षा असते.

कोणते मॉडेल स्वीकारावे? : फिनटेकला समाविष्ट करण्याचे दोन मार्ग आहेत. एक सेंट्रलाइज्ड व दुसरा डिसेंट्रलाइज्ड मॉडेल. सेंट्रलाइज्ड मॉडेलमध्ये, एक समर्पित इनोव्हेशन टीम स्थापन केली जाते. ती कंपनीच्या बिझनेस युनिटपेक्षा वेगळी असते. डिसेंट्रलाइज्ड पद्धतीत, वैयक्तिक बिझनेस युनिट प्रकल्प राबवतात आणि बाह्य फिनटेक प्रदात्यासोबत स्वतंत्रपणे काम करतात. या दोन्ही मॉडेलचे लाभ देणाऱ्या हायब्रिड मॉडेलचा स्वीकार करणे योग्य आहे. आपल्याला एक रचनाबद्ध आणि स्पष्ट नेतृत्व तसेच लवचिकतादेखील हवी असल्यास, केवळ या मार्गानेच या क्षेत्राला फिनटेक क्रांतीचे फायदे मिळू शकतील.

भविष्यातील शक्यता : पुढील पिढी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान आधारीत सोल्युशन्सवर जास्त अवलंबून असल्याने बँकांनी यासाठी पुढे सरसावले पाहिजे. खरं तर, मोठ्या बँका आधीपासूनच परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पडद्यामागील प्रक्रियेत नव्या काळातील तंत्रज्ञान प्रक्रियांमध्ये समाविष्ट करून घेत आहेत. गुंतवणूक बँकिंगने फिनटेकला स्वीकारले तर या क्षेत्रावरही कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव वाढेल. फसवणूक आणि घोटाळे टाळण्यासाठी अनेक तंत्रज्ञान एआयचा वापर करत आहेत. उदा. डिजिटल बँकिंग, क्रिप्टोकरन्सी, एंटरप्राइज टूल्स, सॉफ्टवेअर आणि विमा उद्योग इत्यादी. यासोबतच, अनेक लोक ऑनलाइन वित्तीय खाती वापरत असल्याने पेचेक्सचा वापरही वाढत आहे. उदा. जगभरातील स्टार्टअप्स फिनटेक ॲप आणि वैयक्तिक पेमेंट पर्यायांद्वारे बँकेत खाती नसतानाही कर्मचाऱ्यांचे पगार देत आहेत. गुंतवणूक बँकांना त्यांचा वेग वाढवून खर्चही कमी करावा लागेल. गुंतवणूक बँकांचे भवितव्य हे मोठ्या प्रमाणवर स्वयंचलित आणि संभाव्यत: मोठ्या प्रमाणावर बाह्य, ब्लॉकचेन समर्थित, बॅक ऑफिसवर सक्षम इन-क्लास ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आधारीत असेल. तसेच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याकरिता एआय आणि ॲनलेटिक्स समर्थित फ्रंट ऑफसचीही मदत मिळेल.

संपादन – विरेंद्र तळेगांवकर

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami