नवी दिल्ली – कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ सुरु झाला आहे. मात्र आता कोव्हिडपेक्षाही भयंकर ‘कॅमल फ्लू’ नावाच्या घातक आजाराचा प्रसार इथे उग्र रूप धारण करत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,विशषतः फिफा विश्वचषक पाहण्यासाठी जगभरातून फुटबॉल चाहते कतारला येत आहेत. अशा परिस्थितीत इथे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. कमळ फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराचा धोका त्यामुळे येथील फुटबॉल प्रेमी आणि स्थानिक लोकांसह खेळाडूंवरही हौऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धा २० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यंदा कतारमध्ये २०२२च्या विश्वचषकासाठी सुमारे १.२ दशलक्ष चाहते इथे आले आहेत. मात्र या फ्ल्यूमुळे संपूर्ण जगाचे कतारकडे लक्ष आहे. न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, इव्हेंट मध्ये जास्त लोक एकत्र आल्यामुळे संसर्गजन्य रोगाचा झपाट्याने प्रसार होण्याचा धोका निर्णाण होण्याची शक्यता आहे.
कतारकडून याची विशष दक्षता घेतली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रेक्षकांनी सतर्क राहणे आणि संसर्गाबद्दल जागृत राहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी कतारकडून विशेष काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. फुटबॉल चाहत्यांना तेथील उंटांना स्पर्श न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खाण्यापिण्याच्या सुरक्षित वापरासाठी नियमांचे पालन करणे तसेच, फुटबॉल प्रेमींकडून नियमित लसीकरणासह उपस्थतीत राहावे अन्यथा येथे येणे टाळावे. अशा प्रकारच्या सूचना कतारकडून देण्यात आल्या असल्याचे समजते