संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

फुले दाम्पत्याचे छायाचित्र मंत्रालयात लागणार! मुख्यमंत्र्यांचा आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मंत्रालयाच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांचे छायाचित्र लागणार आहे. असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या तळ मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी फुले दाम्पत्याचे छायाचित्र लावण्यात येणार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही घोषणा किंवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र प्रदर्शनीय ठिकाणी लावण्यात यावी ही मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात केलेलं काम हे समाजाला प्रबोधन करणारे आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरामध्ये या दोन्ही महात्म्यांचे छायाचित्र असावे अशी मागणी अनेक वेळा सामाजिक संस्थांकडून करण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami