अंतानानारिव्हो : मादागास्करला अलिकडेच चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला होता. या वेळी ताशी २३० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने यात अनेक नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. जगातील चवथे मोठे बेट समजल्या जाणार्या मादागास्करमध्ये चक्रीवादळामुळे अनेक लोक बेघर झाले आहे. आतापर्यंत या वादळाने ६० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. या वादळात संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले असून, सुमारे ४७ हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
या चक्रीवादळाने मादागास्करच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिल्याने, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील अनेक घरांची छप्परे उडाली आहेत. आतापर्यँत ६० जण ठार झाले आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. फेंड्री चक्रवादळाचा जोर वाढत असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि १० प्रदेशांमध्ये वाहतूक बंद करण्यात आली आहे. फ्रेडी वादळाचा आता मानंजरी या पश्चिमेकडील शहरावर तडाखा बसला असून येथील १६,००० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर येथील ५,००० घरे कोलमडून पडली आहेत. फ्रेडी चक्रीवादळ मादागास्करमधून मोझांबिकमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. से झाले तर दोन दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित होऊ शकतात. फेंड्री वादळाचा जोर कायम राहिल्या हिंद महासागरातील चागोस द्वीपसमूह जवळ नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याची भीती देखील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.