संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

फोन टॅपिंग प्रकरणात नेत्यांची तोतया नावे; नाना पटोलेंना अमजद खान म्हणायचे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या फोन टॅपिंग प्रकरणात नेमके कुणाचे फोन टॅप केले जात होते याबाबतची माहिती उघड केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले, बच्चू कडू,आशिष देशमुख आणि संजय काकडे यांची नावे आहेत.फोन टॅप करताना या राजकिय मंडळीना तोतया नावाने संबोधले जात होते.त्यात नाना पटोले यांना अमजद खान नावाने फोन टॅप केला जात होता असे वळसे पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी पुण्याच्या आयुक्त असताना काही फोन टॅप करून त्याचा राजकीय कामासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेतही आवाज उठवण्यात आला होता. शिवाय त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.त्यांनी चुकीच्या पद्धतीने आणि योग्य ती प्रक्रिया न अवलंबता फोन टॅप केले होते, हे अहवालातून स्पष्ट झाले आहे.त्यामूळेच त्यांच्यावर करवाई करण्यात आली आहे.”काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय काकडे, आशीष देशमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते.त्यावेळी नाना पटोले-अमजद खान,बच्चू कडू-निजामउद्दिन बाबू, संजय काकडे – परवेज सुतार व अभिजित नायर आणि आशिष देशमुख-रघु चोरगे व महेश साळुंखे अशी नावे घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर करवाई झाल्यामुळे शुक्ला यांच्यावर कारवाई झाली असे बोलले जात आहे, परंतू असे काही नाही. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami