संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

फ्रान्सकडून मिळालेली ३५ राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जगभरात रशिया आणि युक्रेन युद्धाची चर्चा सुरू असताना आपल्या शत्रू राष्ट्रांना नामोहरम करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताने फ्रान्सशी केलेल्या करारांतर्गत ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी आणखी तीन विमाने मंगळवारी रात्री भारतीय हवाई दलात दाखल झाली. त्यामुळे आता ३६ पैकी केवळ एका विमानाची डिलिव्हरी बाकी असून तेदेखील पुढील काही आठवड्यांत हवाई दलाच्या ताफ्यात येणार आहे.

फ्रान्समधून ८ हजार किलोमीटर हवाई अंतर कापून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहेत, अशी माहिती हवाई दलाने बुधवारी दिली. या विमानांना प्रवासादरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाने इंधन पुरवले. केंद्र सरकारने सप्टेंबर २०१६मध्ये फ्रान्स सरकारसोबत ३६ राफेल विमानांसाठी ५९ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत ३६ पैकी ३५ राफेल विमाने भारताला मिळाली आहेत. हवाई दलाने यातील ३० हून अधिक विमानांचे फ्रान्समधून टेक ऑफ केल्यानंतर मार्गात कुठेही न थांबता ती थेट भारतात उतरली आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami