मेक्सिको- आपण एखाद्या प्रवासाला जात असताना वेळेची काळजी आपण करायला पाहिजे की इतरांनी? जर आपली गाडी चुकली तर त्याला जबाबदार कोण? पण फ्लाईट चुकली म्हणून एका महिलेने कर्मचार्याला जबाबदार धरत मारहाण केल्याची घटना घडली आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला एअरपोर्टवर असलेल्या कर्मचार्यांना मारहाण करताना दिसत आहे. फ्लाईट चुकल्यामुळे तिने तेथील कर्मचार्यांना जबाबदार धरले असल्याची माहिती समोर आली पाहिजे. पण नेटकर्यांनी या महिलेवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान अशावेळी आपल्या वेळेची आणि कामाची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.