संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

बँकांचा १९ नोव्हेंबरला देशव्यापी लाक्षणिक संप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून व्यवस्थापन एकतर्फी निर्णय घेत आहे. त्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबरला देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यात सुमारे ३ लाख कर्मचारी सहभागी होतील, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने म्हटले आहे.
सरकारची कामगार विरोधी धोरणे, खासगीकरण आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबरला लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यात देशभरातील सुमारे ३ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकांचे कामकाज कोलमडणार आहे. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांना बसणार आहे. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांवर संपाचा फारसा परिणाम होणार नाही. व्यवस्थापन आतापर्यंत कामगार संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घेत होते. परंतु आता एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. कर्मचारी संघटनांना विश्वासात घेतले जात नाही. म्हणून हा संप पुकारला आहे, अशी माहिती संघटनेचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami