सातारा – बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ आणि युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
कर्नाटकातील चिकोडीत जन्मलेल्या पी. एन. जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागात १५ ते १६ वर्षे त्यांनी काम केले. त्यानंतर बँक ऑफ इंडियात वरिष्ठ अधिकारी म्हणून ते काम करत होते. १९९० मध्ये दि युनायटेड वेस्टर्न बँकेचे ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर साताऱ्यात ते स्थायिक झाले. तिथे आज सकाळी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.