संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर वाढवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हपाठोपाठ आता बँक ऑफ इंग्लंडने आपल्या प्रमुख व्याजदरात वाढ केली. मात्र, यावेळी तुलनेत कमी दरवाढ करण्यात आली आहे. चलनवाढीचा वेग मंदावला असतानाच बँक ऑफ इंग्लंडने आपला प्रमुख व्याजदर 0.50 टक्क्याने वाढवून 3.5 टक्के केला आहे. व्याजदराची ही 14 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.
बँक ऑफ इंग्लंडने डिसेंबर 2021 पासून सलग नवव्यांदा व्याजदर वाढवले असून बँँकेने शेवटच्या बैठकीत व्याजदरात 0.75 टक्के वाढ केली. ही गेल्या 30 वर्षांतील व्याजदरातील सर्वाधिक वाढ होती. ब्रिटनमधील महागाई गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च पातळीवरून खाली आली आहे. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडने आपल्या व्याजदरात वाढ केली असून स्वित्झर्लंडची मध्यवर्ती बँक स्विस नॅशनल बँकेनेही गुरुवारी आपले प्रमुख व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. एक दिवस आधी फेडरल रिझर्व्हने देखील 0.50 टक्क्यांनी व्याजदर वाढवले. महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धर्तीवर युरोपातील इतर देशांच्या मध्यवर्ती बँकाही त्यांचे व्याजदर वाढवू शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami