संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

बँक व्यवस्थापकाची पत्नी, मुलाकडून सातव्या मजल्यावरून ढकलून हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- अंधेरीमध्ये राहणार्‍या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या (सिडबी) सहव्यवस्थापकाची त्याची पत्नी आणि मुलाने सातव्या मजल्यावरून खाली ढकलून हत्या केली. संतनकृष्णन शेषाद्री असे या सहायक व्यवस्थापकाचे नाव असून, अंबोली पोलिसांनी त्यांच्या पत्नी जयशीला आणि मुलगा अरविंद या दोघांना अटक केली.पोलिसांना संशय येऊ नये यासाठी या दोघांना ही आत्महत्या असल्याचे सविले. मात्र घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून पोलिसांनी काही तासांतच ही हत्या असल्याचे उघडकीस आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई मार्गावर असलेल्या सिडबी बँकेच्या ऑफिसर क्वार्टर्समध्ये सातव्या मजल्यावर संतनकृष्णन शेषाद्री हे पत्नी आणि मुलासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संतनकृष्णन सातव्या मजल्यावरून खाली कोसळले. काही वेळाने जयशीला आणि अरविंद जोरजोरात ओरडू लागल्याने आजुबाजूचे रहिवासी जागे झाले. उडी मारली, आत्महत्या केली असे ते ओरडत होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना देखील त्यांनी तेच सांगितले. मात्र पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतनकृष्णन यांचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्यांच्या हाताची नस कापली असल्याचे लक्षात आले. संशय आल्याने पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली, त्यावेळी भिंतीवरील आणि लादीवरील रक्ताचे डाग पुसलेले आढळले. पोलिसांनी या सर्वांवर बोट ठेवताच जयशीला आणि अरविंद यांनी हत्येची कबुली दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami