संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

बँक FDमधील लॉकईनच्या कालावधीत बदल?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटसाठी इंडियन बँक असोसिएशनने (IBA) अर्थमंत्रालयाकडे एक प्रस्ताव जारी केला आहे. आयबीएने २०२२ च्या अर्थसंकल्पातील काही नियमांत बदल झाले पाहीजेत असं म्हटलं आहे. बँक FDमधील लॉकईनचा कालावधी ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करून करात सूट द्यायला हवी, अशा प्रकारचा प्रस्ताव IBAने अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे.

बँक एफडीचा लॉकईन कालावधी पाच वर्षांवरून थेट तीन वर्षांपर्यंत कमी करून करात सवलत दिली पाहीजे. कारण करात सवलत दिल्यामुळे एफडी इतर उत्पादनांच्या तुलनेत अधिक आकर्षक होईल आणि गुंतवणूकदार एफडीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देईल. टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी FD मध्ये तीन वर्षांचा लॉक-ईन कालावधी असावा. जेणेकरून गुंतवणूकदार बँकेमध्ये अधिक पैसे ठेवतील. कारण मागील काही वर्षांपासून एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक करणं सातत्याने कमी होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात सातत्याने कपात केल्याचे दिसून आले आहे. फक्त मोठ्या बँका केवळ ५ ते ६ टक्के दराने व्याज देत आहे. मात्र, काही गुंतवणूकदार त्यांच्या ठेवी बँकेतून काढून घेत आहेत आणि शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. एफडीमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ गुंवतणूक केल्यास प्राप्तिकराच्या कलम ८०सी अंतर्गत टॅक्सवर मोठी सवलत मिळते. मात्र, सर्वच एफडींना टॅक्सचा लाभ मिळत नाही. या संदर्भातही गुंतवणूकदार बँकांच्या एफडीमध्ये कमी प्रमाणात भाग घेत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami