संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बंगालमधील ‘ओआरएस” चे जनकडॉ. दिलीप महालनोबिसचे यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता- पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि ओआरएसचे जनक, डॉ.दिलीप महालनोबिस यांचे नुकतेच उपचारा सुरू असताना रूग्णालयात निधन झाले.ते ८८ वर्षांचे होते. त्यांना फुफ्फुसाच्या व्याधीने आणि अन्य आजाराने ग्रासले होते.त्यांच्या निधनाने देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. १९७१ साली बांग्लादेश मुक्ती संग्रामावेळी आलेल्या पटकी म्हणजेच कॉलराच्या आजाराने थैमान घातले होते.त्यावेळी लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी डॉ. दिलीप महालनोबिस यांनी यशस्वीपणे शर्थीचे प्रयत्न केले होते.
डॉ. दिलीप महालनोबिस यांचे कोलकाता शहरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी ओरल रिहायड्रेशन थेरपी क्षेत्रात कार्य केले होते. त्यांना २००६ मध्ये थायलंडच्या प्रिन्स महिडोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ.रिचर्ड ए.कॅश आणि डॉ.डेव्हिड आर.नलिन यांच्या समवेत त्यांनी जॉन होपकीन्स युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च मध्ये संशोधन केले होते. १९७१ मध्ये बांग्लादेश नागरिक मोठ्या संख्येने पश्चिम बंगालमध्ये आले होते. त्याच्यासाठी शरणार्थी शिबिर बनवले होते.पण त्याठिकाणी त्यावेळी पटकी आजाराची मोठी साथ पसरली होती. अनेक जण त्यावेळी दगावत असल्याचे समोर येत असताना डॉ. महालनोबिस शर्थीचे प्रयत्न करून लाखो लोकांचे प्राण वाचवले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami