संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलातील खर्च भाजपनेच केला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या वॉशिंग पावडरने भ्रष्टाचारीसुध्दा स्वच्छ होऊ शकतात. तसेच ईडी, सीबीआय तसेच आयटी या तपास संस्था भ्रष्टाचाराच्या विरोधातील शस्त्र नसून ते अन्य दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मोदी-शहा यांच्याजवळ आणणारे अस्त्र आहे,अशी सडकून टीका जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या व राज्यसभेच्या खासदार कॉ. वृंदा करात यांनी करत महाराष्ट्रातील बंडखोर घटनेवर मोठा गौप्यस्फोट केला.करात म्हणाल्या की, ‘ महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलातील खर्च भाजपला मिळालेल्या देणग्यांतून केला गेला होता.”

सांगली जिल्ह्य़ातील विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते वृंदा करात यांना क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वृंदा करात बोलत होत्या. यावेळी वृंदा करात पुढे म्हणाल्या की, केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून स्वत:चा पक्ष वाढविण्याचे काम सुरू केले आहे. मोदी व शहा यांच्याकडे असलेल्या वॉशिंग पावडरने भ्रष्ट लोकांना शुध्द करून पक्षात पवित्र केले जात आहे.केवळ मोदी सरकार बळकट करण्यासाठी व विरोधकांना विस्कटण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.गेल्या काळात ईडीने ३ हजार ७०० जणांवर गुन्हे दाखल केले. मात्र त्यातून केवळ २३ जण दोषी आढळले. तुम्ही जर विरोधात असाल तर भ्रष्टाचारी आणि भाजपात आला तर स्वच्छ पवित्र असाल असे यातून दाखवायचे आहे. दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या महागाई नसल्याचे सांगत आहे, हे सांगताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जर भाजपला तिरंगाबाबत प्रेम निर्माण झाले असेल तर ते चांगलेच आहे. परंतु, संविधानाला धाब्यावर बसवून जर तुम्ही केवळ दिखावा करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविणार असाल तर देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा देत हर घर तिरंगा सोबतच हर घर संविधान घेऊन ही मोदी सरकारने जावे,असेही कॉ. वृंदा करात म्हणाल्या.

प्रारंभी संघटक ॲड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऍड.नानासाहेब पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले.ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर,कॉम्रेड अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आ.अरुण लाड, सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माधवराव मोहिते,ज्येष्ठ विचारवंत बाबुराव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami