संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

बंडखोर आमदार प्रदीप जैस्वालांची महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबादमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची महानगरप्रमुख पदावरून उचल बांगडी झाली आहे. त्यांच्या जागी शिवसेनेने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नवे महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ७ वर्षांपासून जैस्वाल शिवसेनेचे औरंगाबाद महानगर प्रमुख होते.
औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली. तणवाणी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले होते. मात्र नंतर काही दिवसातच ते पक्षकार्यापासून दूर झाले होते. आता जैस्वाल यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत पुन्हा सक्रिय करण्याच्या हेतूने त्यांची महानगर प्रमुखपदी नेमणूक केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami