मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचे नाराजीनाट्य सुरु झाले. राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले आणि बच्चू कडू यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी शिंदे गटाने चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्ते देखील असणार आहेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामिल असलेले आमदार आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत.गेल्या ५ दिवसांपासून राज्यात अनेक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला १२आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या ३८ हून अधिक झाली आहे.