संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

बंद केलेली पत्रकारांची
ट्विटर खाती पुन्हा सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क – जगातील प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती व ‘ट्विटर’चे प्रमुख इलॉन मस्क यांच्या विरोधात बोलणार्‍या आणि लिहिणाऱ्या अनेक पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती अचानक कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली होती.मात्र, त्यावर जगभरातून जोरदार टीका झाल्यानंतर या पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती बंद करताच शुक्रवारी जगाच्या कानाकोपऱ्यांतून सरकारी अधिकाऱ्यांचे दबाव गट आणि पत्रकारांच्या संघटनांकडून टीकेची झोड उठल्यानंतर या खात्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. मस्क यांनी नंतर घेतलेल्या ‘ट्विटर’ सर्वेक्षणात बहुसंख्य जणांनी निलंबित केलेली ही ‘ट्विटर’खाती पुन्हा कार्यान्वित करावीत,असेच मत व्यक्त केले.हा कल पाहिल्यानंतर मस्क यांनी शनिवारी एका ‘ट्वीट’ संदेशात नमूद केले,की बहुसंख्य लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. ज्या ‘ट्विटर’ खात्यांनी माझ्या ठावठिकाण्यासंदर्भात माहिती दिली,त्या खात्यांचे निलंबन आता मागे घेतले जाईल.त्यानंतर आता न्यूयॉर्क टाइम्स,सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांची निलंबित खाती सुरू केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या