संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

बंद शाळा सुरू करण्यासाठी उपाशीपोटी निघालेल्या चिमुकल्यांपुढे अधिकारी नमले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक- इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते पैकी दरेवाडी येथील शाळा बंद केली म्हणून ४० मुले दप्तर घेऊन काल शुक्रवारी सकाळी उपाशीपोटी १२ कि.मीचा प्रवास करण्यासाठी पायी निघाले.हे चिमुकले इगतपुरी पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातच शाळा भरवणार होते.या आंदोलनाची कुणकुण लागताच शिक्षण नमला. आता ही शाळा तात्काळ सुरू करण्याचे लेखी आश्वासन या चिमुकल्यांना देण्यात आले आहे.
हे विद्यार्थी काल दुपारी एक ते दीडच्या दरम्यान इगतपुरी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवणार होते. त्यासाठी सर्वजण उपाशीपोटी पाठीला दफ्तर लावून पायीच इगतपुरीकडे चालले होते. मात्र याची कुणकुण लागताच गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या सहकार्‍यांसह या विद्यार्थ्यांना पुलावरच गाठले. विशेष हे आंदोलन करू नये म्हणून अगोदर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांसमोर अक्षरशः लोटांगण घातले होते.तरीही हे विद्यार्थी पायी चालले होते. पण अखेर गट शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पुलावरच चर्चा करून ही शाळा तातडीने सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांनी इथेच संपविले आणि आनंद व्यक्त केला.
दरम्यान,तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते पैकी दरेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते चौथीपर्यंत होती. धरणामुळे दरेवाडीचे नवीन जागेत पुनर्वसन केले. मात्र काही कुटुंब त्या जागेत जाण्यासाठी तयार नाही, म्हणून ४० कुटुंबाचे नवीन जागेत पुनर्वसन केले आणि त्या ठिकाणी शाळा सुरू होती. मात्र ती शाळा बंद करण्याचे पत्रच काल शाळेच्या मुख्याध्यापकाला आले आणि काल पासून शाळा बंद केली.त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami