नवी दिल्ली- देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी ‘बच्चे दो ही अच्छे’ असे धोरण आखण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आमचे ते काम नाही, असे सांगून सुप्रीम कोर्टाने याबाबतची याचिका आज फेटाळली.
वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत आहे. त्या दिशेने प्रयत्न करत आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी धोरणे ठरवण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. आम्ही ते काम करू शकत नाही. आमचे ते कामच नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने लोकसंख्येवर नियंत्रण घालण्याबाबत आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.