संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

बलुचिस्तानमध्ये बस दरीत कोसळून 39 जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कराची- पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील लसबेला जिल्ह्यात रविवारी पहाटे बस पुलावरून दरीत कोसळली. काही वेळातच बसने पेट घेतल्याने 39 जणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये सुमारे 48 प्रवासी होते.
ही बस क्वेटाहून कराचीला जात होती. चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने पुलावरील पिलरला धडकून ती दरीत कोसळली. बसला प्रचंड आग लागली. अपघाताचा आवाज आल्यानंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही क्षणात अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला. ट्रेनच्या सहाय्याने बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि 8 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर जखमींना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या