संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

बल्क औषध प्रकल्पाविरोधात
शेतकर्‍यांचा 1 नोव्हेेंबरला मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अलिबाग – मुरुड, रोहा तालुक्यात केेंद्र सरकारचा होणारा बल्क औषध निर्मित प्रकल्प इतर राज्यात गेला असल्याने शेतकरी आनंदित होते. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून, आजही त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार 1 नोव्हेेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकरी बांधव आपला विरोध दर्शविणार आहेत. त्यामुळे बल्क प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेेत आला आहे. आज शेतकरी, मच्छीमार यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे माजी दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहिते म्हणाले की, प्रकल्प नको असताना तो लादण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जात आहे. विद्यमान उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे अलिबाग येथे आले असता बल्क औषध निर्मित प्रकल्प राज्य सरकार उभारणार असून, एमआयडीसीमार्फत भूसंपादन केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आम्ही भाजप नेत्यांना आधीच हा प्रकल्प नको अशी भूमिका समजावून सांगितली आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी घेतलेल्या निर्णयाची भाजपा नेत्यांना किंवा मंत्र्यांना माहिती नाही, असा आरोपही मोहिते यांनी यावेळी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami