संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बसच्या खिडकीतून डोक बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद : औरंगपुरा ते साजापूर या मार्गावर शहर बसमध्ये शेवटच्या सीटवर बसलेल्या विद्यार्थ्याचा खिडकीबाहेर डोक काढल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बसचालक बस मागे घेत असताना त्याचे डोके खांबाला आदळले आणि त्यातच या मुलाचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेतील ओमकारेश्वर पंडित असे मृत मुलाचे नाव आहे.एसबी शाळेच्या नववी इयत्तेमध्ये शिकत होता.हा मुलगा शाळा सुटल्यानंतर शहर बसने आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. औरंगपुरा ते साजापूर या मार्गावर धावणा-या औरंगाबाद महानगरपालिकेची शहर बसमधून ओंकारेश्वर प्रवास करीत होता. तो बसच्या मागील सीटवर बसला होता. ड्रायव्हर बस मागे घेत असताना ओंकारेश्वरने खिडकीतून डोके बाहेर काढले. त्यामुळे एका मोठ्या खांबाला त्याचे डोके आपटून त्याच्या डोक्याला जबर मार लागला. बस चालकाला अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याने बस थांबवली. त्यानंतर मुलाला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारावेळी ओंकारेश्वरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami