संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बांगलादेशच्या बोट दुर्घटनेतील हिंदू भाविक मृतांची संख्या ६४

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ढाका – दुर्गा उत्सवापूर्वी रविवारी बांगलादेशच्या कोरोटो नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृत हिंदू भाविकांची संख्या ६४ झाली आहे. आणखी २० जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशच्या उत्तर भागात रविवारी दुर्गा पुजा उत्सव सुरू होण्यापूर्वी काही भाविक कोरोटो नदीतून बोटीने पुरातन बोडेश्वरी मंदिराकडे जात होते. त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे ही बोट उलटून अपघात झाला. त्यात ६४ जण मृत्युमुखी पडले. २० जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी देबीगंज आणि बोडा उपजिल्ह्यातील नदीच्या पात्रात १४ मृतदेह सापडले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू होते. दोन दिवसांत नदीतून ५० मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर आणखी १४ मृतदेह सापडल्यामुळे यातील बळींची संख्या ६४ झाली. २० जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पंचगढ जिल्ह्यातील कोरोटो नदीत ही दुर्घटना घडली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami