संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

बांग्लादेशमध्ये हिंदू मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ढाका:- बांगलादेशात पुन्हा एकदा कट्टरपंथी लोकांनी हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. झेनाईदह येथील दौतिया गावातील काली मंदिरात तोडफोड झालेल्या मूर्त्यांचे अवशेष सापडलेत. मंदिरातील समिती अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. दौतिया जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अमित कुमार बर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. ब्रिटीशांच्या काळापासून येथे पूजा केली जात आहे. अतिशय प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मंदिर परिसराच्या अर्धा किलोमीटर अंतरावर मूर्तीचा वरचा भाग पडून होता.बांगलादेशात 10 दिवस चाललेली दुर्गा पूजा संपल्यानंतर 24 तासांच्या आत ही घटना घडली आहे.‌ बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायांवर धर्मांधांचे हल्ल्यामुळे हिंदूंमध्ये दहशत निर्माण झाली आहे.बांग्लादेशमध्ये याआधीही अशा घटना घडल्या आहेत. ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिराची तोडफोड झाली होती. तसेच भाविकांनाही तोडफोड करणाऱ्यांनी मारहाण केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami