संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

बांधकाम कामगारांंसाठी आरपीआयचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू करा. तसेच मेडिक्लेम योजना सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापुरातील दसरा चौकातून चालू झालेला मोर्चा व्हीनस कॉर्नर, गोकुळ हॉटेल मार्गे शाहूपुरी येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांधकाम कामगारांची जिवन योजना म्हणून समजले जाणारे मेडिक्लेम योजना, स्वतंत्र घरकुल योजना, मध्यान्ह भोजन योजना बंद करून बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी. यासह बांधकाम कामगारांना दिवाळीमध्ये दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर मृत्यु झाल्यास त्याला टू ए फाईव्ह सिक्स या योजनेचा लाभ मिळावा. आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांसह बांधकाम कामगार सहभागी होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami