संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

बापरे…नागपुरात एकाच शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – नागपुरात एका खासगी शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी शहरात तब्बल २६२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. यामध्ये जयताळा भागातील रॉय इंग्लिश स्कूलमधील ३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशींनी याबाबत माहिती दिली. या शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी व घशाला खवखव ही लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे १५ जुलैला सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रविवारी या चाचण्यांचा अहवाल आला आणि ३८ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या १ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १ हजार १९३ रुग्ण गृहविलगीकरणात आणि २८ रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत भरती आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami