संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बाप्पाच्या विसर्जनाला राजकीय मतभेद बाजूला सारून नेतेमंडळी एकत्र आले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूकीत दोन राजकीय विरोधक एकत्र आले. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे एकत्रच पुण्यातील कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रच कसबा गणपतीची पालखी खांद्यावर घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गणरायाचा जयघोष केला. सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता गणपती मिरवणुकीतील हे चित्र जनतेसाठी नक्कीच सुखावणारे होते. असेच दुसरे चित्र इंदापूर शहरात दिसले. हर्षवर्धन पाटील-प्रदीप गारटकर यांनी दिला मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला खांदा दिला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महाआरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली.राज्यात राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविणारे दोन वेगवेगळी दृश्य नागरिकांना पाहायला मिळाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami