संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बाप्पाला उचलून पाण्यात फेकले! राणांचे संतापजनक गणेश विसर्जन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – गांधीनगर येथील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खासदार नवनीत राणांवर गणेशभक्तही प्रचंड संतापले आहेत. राणा दांपत्याने आपल्या बाप्पांचे विसर्जन करताना मूर्ती उचलून सरळ पाण्यात फेकून दिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राणांवर निशाणा साधला आहे. गणेश विसर्जनाची ही कुठली पद्धत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. याविषयी गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या गणेशाचेही शुक्रवारी विसर्जन झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी राणांना तुफान ट्रोल केले आहे. तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता. मग गणपती विसर्जन कसे करतात हे तुम्हाला माहित नाही का? असा सवाल राणांना लोकांनी विचारला आहे. खासदार राणा यांनी डोक्यावरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेली. घोषणा देत पाण्याजवळ ते गेले. नंतर नवनीत राणांनी मूर्ती उचलून थेट पाण्यात फेकली. त्यांची गणेश विसर्जनाची ही पद्धत नेटकऱ्यांना आणि गणेशभक्तांना खटकली. ही कुठली विसर्जनाची पद्धत असा सवाल नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. कथित लव्ह जिहाद प्रकरणी पोलिस ठाण्यात राडा करून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नवनीत राणा यांनी माफी मागावी, अशी मागणी पोलिस कुटुंबीयांनी केली आहे. असे असताना त्या या प्रकारामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनीही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरून राणा दाम्पत्याचे हिंदुत्व किती बेगडी आहे ते स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami