संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

बाबा रामदेव यांची रुची सोया फेब्रुवारीअखेर एफपीओ आणण्याच्या तयारीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाची उपकंपनी असलेली रुची सोया लवकरच एफपीओ आणणार आहे. फेब्रुवारी २०२२च्या शेवटच्या आठवड्यात रुची सोया एफपीओ म्हणजे फॉलो-अप पब्लिक ऑफर लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) जारी केल्यानंतर ती स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होते पण जर कंपनीला तिची इक्विटी अधिक पातळ करायची असेल आणि अधिक निधी उभारायचा असेल तर, तिथूनच एफपीओ अस्तित्त्वात येतो. सोप्या भाषेत एफपीओला दुय्यम ऑफरिंगदेखील म्हणतात.

रुची सोया कंपनीने जून 2021 मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. त्याला लगेचच सेबीची मंजुरी मिळाली. कंपनीच्या प्रवर्तकांकडे सध्या या कंपनीत तब्बल 99 टक्के हिस्सा आहे. तर लोकांची म्हणजे सर्वसामान्य गुंतवणुकदारांची शेअरहोल्डिंग 1.1 टक्के आहे. आता कंपनीच्या प्रवर्तकांनी यासाठी एफपीओचा मार्ग निवडला असून या माध्यमातून मिळालेल्या रक्कमेतून बँकांचे कर्ज फेडता येईल, अशी त्यांची योजना आहे. परंतु बातम्यांनुसार, या एफपीओला म्हणजे रुची सोयाच्या शेअर्सना कोणतीही मागणी नाही.

दिवाळखोर घोषित झालेली रुची सोया ही खाद्यतेल कंपनी रामदेव बाबांनी 2019 मध्ये सुमारे 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले. ती आधीच लिस्टेड कंपनी आहे. पतंजली आयुर्वेदने अधिग्रहण केल्यापासून रुची सोयाच्या शेअर्सच्या किंमतीत चांगलीच वाढ होत होती. रुची सोया भारतातील खाद्य तेलाच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. देशातील खाद्यतेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक रुची सोया आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami