बारामती : बारामती तालुक्यातील खांजड या गावामधील शेतात भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. यावेळी परिसरात अचानक हेलिकॉप्टर उतरल्यामुळे नागरिकांची खळबळ उडाली.मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहीती समजल्यानंतर बघ्यांनी गर्दी केली. यावेळी कोणालाही इजा झाली नसून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.हेलिकॉप्टरच्या दुरुस्तीनंतर सोलापूर येथे रवाना करण्यात आले.
पुण्यावरुन हैदराबादला निघालेले भारतीय वायुदलाचे चेतक हेलिकॉप्टरे अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खांडज गावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामध्ये तीन पुरुष तर एक महिला प्रवासी प्रवास करीत होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याशिवाय कोणाला इजा झाली नसल्याची माहिती माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. यावेळी गावात थोडावेळ वेगवेगळ्या प्रकारची अफवा पसरली होती. यावेळी माळेगाव पोलिसांनी बंदोबस्त केला असून वायूदलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.तसेच हेलिकॉप्टरमधील बिघाडाची दुरुस्ती तिथेच करण्यात आली.