संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बारामतीमध्ये बावनकुळेंचे विधान! देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या मिशन बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणतात,याआधी अनेक गड उद्धवस्त झाले आहे.बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली.यावेळी त्यांनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या बारामतीच्या पूर्णवेळ प्रभारी आहेत.

पुढच्या १८ महिन्यांत निर्मला सीतारमण ५ ते ६ वेळा बारामती दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल या दृष्टीने या दौऱ्यांमध्ये विचार करण्यात येईल”, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच या युतीच्या माध्यमातून विधानसभेत २००हून जास्त तर लोकसभेत राज्यातून ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami