बारामुल्लात ‘लष्कर ए तोयबा’च्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

सोपोर – संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना सीमेवर मात्र दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण फयाज वार हा लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर होता. जवान आणि नागरिकांवर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी तो जबाबदार होता. अखेर त्याला ठार करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा दलांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला असून अनेक आक्षेपार्ह वस्तूदेखील आढळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना सोपोरच्या वारपोरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काल रात्री जवानांनी हा परिसर पूर्णपणे घेरला आणि शोधमोहीम सुरू केली. मात्र जवानांना पाहताच एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देत जवानांनीही गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. चकमकीदरम्यान जवानांनी एका दहशतवाद्याला काल रात्री उशीरा ठार केले, तर आज पहाटे दुसऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

काश्मीरचे आयपीजी विजय कुमार यांनी वृत्त संस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘सोपोर चकमकीत दहशतवादी संघटन लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. यामधील एका दहशतवाद्याचा अनेक हल्ले आणि हत्यांमध्ये सहभाग होता. त्यामुळे सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. वारपोरा गावात काही दहशतवादी लपल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.’

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami