मुंबई – आज बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडून ऑफलाईन परीक्षा दिल्या आणि घवघवीत यश मिळवलं, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीदेखील बारावीच्या विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि शिक्षण मंडळातील शिक्षक, कर्मचारी, अध्यक्षांचे आभार मानले.
वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे म्हटले की, ‘सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. एका ठिकाणी आपण कोरोनाशी लढत होता, एका ठिकाणी या अवघड परिस्थितीत तुम्हाला अभ्यासाचा तणाव होता. तसेच ज्या तऱ्हेने पालकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर साथ दिली त्यांच्याकडून मेहनत करून घेतली. तुमचे अभिनंदन.’ त्याचबरोबर कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना हताश न होण्याचे आवाहन वर्षा गायकवाडांनी केले. त्या म्हणाल्या, ‘कमी गुण मिळाले असतील किंवा अपयश आलंय असं वाटत असेल तर अशा परिस्थितीत हताश न होता येणाऱ्या काळात पुरवणी परीक्षा आहे. त्यामध्ये आपण श्रेणीवर्धन करू शकता, पास होऊ शकता.’
प्रिय विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो,
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 8, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन! pic.twitter.com/kdND3jFoPi