संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

बारावी लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; ५ आणि ७ मार्चचे पेपर लांबणीवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मंडळाने बदल केला असला तरी परीक्षा नियोजित वेळेतच सुरू होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे मंडळाकडून सूचित करणात आले आहे.

दरम्यान, बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, ५ आणि ७ मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दरम्यान, ४ मार्चला परीक्षा सुरु होणार होती. मात्र काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे ५ मार्चचे पेपर आता ५ एप्रिलला होणार आहेत. तर,७ मार्चचे पेपर आता ७ एप्रिलला होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात परीक्षा का पुढे ढकलण्यात आल्या यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यांच्या माहितीसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेणाऱ्या वाहनाला संगमनेर येथे आग लागली होती. त्या आगीत पेपर जळून नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. मात्र आता हे पेपर ५ एप्रिल आणि ७ एप्रिलला होणार असल्याचे समजते. या व्यतिरिक्त परीक्षांच्या सत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami