संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

बार्शीत झोपडीला आग लागून
वृद्ध दांपत्याचा होरपळून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – घरात पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली असताना अचानक ठिणगी उडाल्याने जनावराच्या गोठ्यासह झोपडीला भीषण आग लागली. या आगीत वृद्ध पती-पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.बार्शी तालुक्यातील गाडेगाव परिसरात आज सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भीमराव काशीराम पवार (९५) आणि कमलबाई भीमराव पवार (९०) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.गाडेगाव परिसरात राहणाऱ्या कमलबाई ह्या नेहमीप्रमाणे सकाळीच उठल्या.त्यानंतर त्यांनी घरातील चुल पेटवली आणि अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले.यानंतर त्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीचा चारा पाणी करण्यासाठी गेल्या.
त्यावेळी म्हैस बांधत असताना घरातील चुलीची ठिणगी उडाल्याने झोपडीला भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले.कमलाबाई यांचे पती घरात झोपले असल्याने भर आगीतच कमलबाई आपल्या पतीला उठवण्यासाठी गेल्या.मात्र, अचानक आगीने उग्ररूप धारण केले.त्यामुळे दोघांनाही घराबाहेर पडता आले नाही.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.अखेर कमलाबाई यांच्यासह त्यांचे पती भीमराव पवार यांच्यासह आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या