संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बाळासाहेबांच्या निधनानंतर माझ्या भाषणावर बंदी, कदमांचा गौप्यस्फोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर असे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत असून मेळाव्याआधी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केला. बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात माझ्या भाषणावर बंदी घालण्यात आली. फक्त शिवाजी पार्कच नाही तर सगळीकडील माझे भाषणे बंद करण्यात आले, याचे कारण मलाही माहिती नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापूर्वी ही प्रथा सुरू केली होती. त्यावेळी एक पक्ष, एक मैदान एक झेंडा अशी भूमिका होती. पण आज शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळत आहेत. पण हे सगळे एकाच पक्षाचे आहेत. पक्षावर ही वेळ का आली हा प्रश्न मला आहे. आम्ही ५२ वर्षे पक्षासाठी काम केलं. पण पक्षाची आजची स्थिती पाहून मला दु:ख वाटत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दोन पावले माघार घेतली असती तर पक्षावर ही वेळ आली नसती, असे रामदास कदम म्हणाले आहेत.तर बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्या आवाजाची तोफ बंद केली असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.याशिवाय मी सर्व आमदारांना गुवाहटीतून मातोश्रीवर आणायला तयार होतो पण शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते, ते मातोश्रीवरून बाहेर निघायला तयार नव्हते आणि आता कसे बाहेर पडले? तर गद्दार कोण हे तुम्हीच ठरवले पाहिजे असेही कदम यावेळी म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami