संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लहान बहिण संजीवनी करंदीकर यांचे आज सकाळी पुण्यात वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मागे मुलगी किर्ती फाटक, स्वाती सोमन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये 38 वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते.

‘स्वाभिमानाने जीवन कसे जगावे, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आई होती, तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अंत्यसंस्काराची देखील तजवीज करून ठेवली होती, आम्हाला कसलाही त्रास होऊ नये, याची तिने काळजी घेतली होती. तिचे आयुष्यच प्रेरणादायी होते, अशा भावना संजीवनी करंदीकर यांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्ती पाठक यांनी व्यक्त केल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami