लखनौ – उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुखातर अन्सारी याला २६ वर्षांपूर्वीच्या ५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवून ५ लाखांचा दंड आणि १० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर त्याच साथीदार भीमसिंग याला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. मुख्तार अन्सारी सध्या बांदा कारागृहात आहे.
१९९६ साली मुख्तार अन्सारी याच्यावर गँगस्टर ऍक्ट अन्वये ५ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात २ गाझीपूर, २ वाराणसी आणि १ चांदोली मध्ये हे गुन्हे दाखल होते. खूप लांबलेल्या या खटल्याची सुनावणी पूर्वी अलाहाबाद न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुरु होती नंतर हा खटला गाझीपूर न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. तेंव्हापासून या प्रकरणी गाझीपूर न्यायालयात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी ११ साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी आणि बचाव पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद १२ डिसेंबरला पूर्ण झाला होता . त्यानंतर १५ डिसेंबरला निकाल दिला जाईल असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज निकाल लागला आणि मुख्तार अन्सारीला ५ लाख दंड आणि १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.मुख्तार अन्सारी हा यूपीतील बाहुबली असून त्याच्यावर खून, खंडणी अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत . मात्र त्यांनी निवडणूक लढवून तो आमदारही झाला होता.