मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची ही बातमी दिली. सोबतच एक खास फोटो शेअर करत त्यांनी आपल्या लेकीचे नावही उघड केले आहे. ‘देवी बसू सिंग ग्रोव्हर’ असे त्यांनी आपल्या लेकीचे नाव ठेवले आहे. शेअर केलेल्या फोटोत बाळाचे पाय दिसत आहेत.
बिपाशा आणि करण या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दोघेही आपल्या बाळासाठी खूप उत्सुक होते. अखेर लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याची प्रतीक्षा संपली. बिपाशाने यावर्षी ऑगस्टमध्ये आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत लिहिले होते की, आमचे बाळ लवकरच आमच्या आयुष्याचा आणि आनंदाचा एक भाग होणार आहे. तुमच्या सवार्र्ंचे प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आमच्या आयुष्याचा एक भाग होत्या आणि नेहमीच राहतील, दुर्गा दुर्गा, असे ती म्हणाली होती.