नवी दिल्ली:-बिल्किस बानो प्रकरणातील अपराधींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या आरोपींच्या चांगल्या वर्तुवणुकीचा दाखला देत न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेविरोधात बिल्किस बानोंनी दाखल केली पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीस न्यायमूर्ती बेला त्रिवेदींनी नकार दिला आहे. त्रिवेदी यांनी सुनावणीस नकार का दिला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बिल्किस बानो गर्भवती असताना तिच्यावर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि तिच्या मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची हत्याकेल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 जणांच्या सुटका शिक्षा पूर्ण होण्याआधी केली. त्या विरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावनी होती.ही याचिका न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. परंतु यातील न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी सुनावणीस नकार दिला.